R. D

DAY 27/30/27/JUNE/2020 

R.D.

आज राहुल देव बर्मन, म्हणजेच आपले लाडके बर्मनदा, किंवा आर. डी. ,ह्यांचा वाढदिवस. आज जर ते हयात असते तर ८१ वर्षांचे असते. पण आर. डी. बद्दल भूतकाळात बोलणंच चुकीचे आहे. ते आजही त्यांच्या सागरासारख्या प्रचंड अश्या संगीतातील कार्यातून आपल्यातच आहेत. त्यांच्या संगीताचे गारुड आजच्या तरुण पिढीवरही तितकेच आहे जितके जुन्या पिढ्यांवर. आजची त्यांची गाणी सहज कुठेही गुणगुणली जातात, म्हंटली जातात. खरंतर आर. डी. अमर आहेत म्हंटलं तर चूक नाही ठरणार.

आर. डी. ची range बघूनच वेड लागतं. नुसती चित्रपटाची नावं बघितली तरी ह्या माणसाचा आवाका कळतो पण तो आपल्या आवाक्यात कधीच येत नाही. १९६० मधले तिसरी मंझील, पडोसन, १९७० मधले कटी पतंग, द ट्रेन, मेला, कारवा, बुढा मिल गया, अमर प्रेम, सीता और गीता, जवानी दिवानी, बोंबे टू गोवा, रामपूरका लक्ष्मण, परिचय, यादो की बारात, अनामिका, जोशीला, आप की कसम, अजनबी, बेनाम, खेल खेल मे, दिवार, आंधी, वॉरंट, खिशबू, शोले, किताब,  
किनारा, धरम करम, घर, कसम वादे, नौकर, द ग्रेट गंबलेर, गोलमाल, आणि किती आणि किती.

त्यांचा तो शोले मधला झोपळ्याचा आवाज, सत्ते ओले सत्ता मधला बाबूच्या एंट्रीला गुळण्या केल्याचा आवाज, आणि अशे हजारो किस्से.

अश्या ह्या संगीताच्या जादूगाराला एक मनःपूर्वक भवांजली म्हणून हा एक छोटासा उपक्रम करायचा विचार डोक्यात आला.

आज आणि उद्या , व्हाट्स अँप गृप वर, आपण आर. डी. ह्याच्या गाण्यांची अंताक्षरी खेळायची. कशी?
१. गृप मधील ऍडमिन किंवा कोणीही उत्साही कार्यकर्त्याने, आर. डी. च्या कुठल्याही एक गाण्याची लिंक youtube वरून गृप वर टाकावी.
२. लिंक टाकल्यावर त्याने गृप मधील कोणा एकाचं नाव लिहावं. त्या माणसापासून अंतक्षरीला सुरवात होईल. त्या माणसाने आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढचे गाणे सुरू करावे. अंताक्षरी खेळतो तसे.
३. त्या माणसाने मग आर. डी. चे कुठलेही गाणे गुणगुणत किंवा म्हणत त्याचा ऑडिओ किंवा विडिओ करून गृप वर टाकावा व पुढ्च्या माणसाचे नाव सुचवावे.
४. त्या माणसानेही हीच प्ररिया करून ही अंतक्षरीची साखळी पुढे चालू ठेवावी.
५. गृप वरील सर्व सदस्यांनी वयक्तिक पणे  भाग घ्यायचा आहे.
६. ऑडिओ किंवा विडिओ करून टाकणे बंधनकारक आहे.
७. सर्वांनी भाग घेणे बंधनकारक आहे
८. प्रत्येक गाणं एकदाच म्हणायला परवानगी आहे.
९. भाग घेण्याच्या उत्साहावर, कधी समारोप करावा हे त्या त्या गृप ने ठरवावे
१०. ही अंताक्षरी साखळी, तुमच्या सगळ्या ग्रुप्स वर तुम्ही खेळू शकता
११. आर. डी. बर्मन साहेबांना अशी भवांजली देऊन आपण थोडी कृतज्ञता व्यक्त करू हाच स्वछ उद्देश. 🙏


© - Rahul Shinde 27/JUN/2020 



Comments