रंग

DAY 16/30/16/JUNE/2020 


रंग


मोरपंखी रंगाची मजाच काही और आहे

निळाईतला हिरवा

हिरवाईतला निळा

जास्त वरचढ कोण आहे?


संधीप्रकाशातला केशरी 

खरच किती केशरी आहे?

लाल आणि पिवळ्याचा

तो एक संगमी मेळ आहे 


हवेतला गुलाबी फारच रंगेल आहे 

लाल मधून शोषलेला 

पांढऱ्याचा तो प्रणय आहे 


जांभळा म्हणजे लाल कमी निळा जास्त 

असं तो रंग आहे 

अनेक काल जिभेवरती 

रेंगाळणारा संग आहे 


असती रंग तीन मूळ

तरी घडे किमया अदभूत

त्या एकाच सफेद झोताचे 

हे रंग वाहणारे पारदर्शी दूत 





  - राहुल शिंदे 




© - Rahul Shinde 16/JUN/2020 

https://tinyurl.com/yd8jq27l




Comments

Post a Comment