Posts

Showing posts with the label marathi poetry

संवाद

Image
DAY 28/30/28/JUNE/2020  कवी सुधीर मोघे ह्यांची ही एक सुंदर कविता. दोन माणसांमधील नाते बांधायला खरच काय लागतं. सर्वात महत्वाचा म्हणजे दोघांमधला समजूतदार पणा, एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास,आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही बघण्याची क्षमता. जर ह्या चार गोष्टी जमल्या तर नातं जुळायला आणि टिकायला काहीच अवघड नाही. नात्यांची अजून एक गरज असते, जी कालांतराने दृढ होत जाते, ती म्हणजे, बोललेले तर समजणे, पण न बोललेही कळणे. आणि इतर गोष्टी जरी यथायोग्य असल्या तरी माझ्या मनातलं, तुला न सांगता कळणं हे प्रेमाचे पराकोटीचे असण्याचा एक पुरावा. ह्याच एकामुद्द्यावरून जोडप्यांमध्ये, भागीदारांमध्ये, किंवा कुठल्याही दोन माणसांमध्ये वाद, तंटा, मतभेद, किंवा अगदी तफावत ही होऊ शकते. त्यामुळे शब्दांच्या पालिकडलिही एक भाषा आहे जी नात्यात रुळणे गरजेचे असते.  अश्या कळण्याच्या प्रवासाबद्दलच कवी म्हणतो, की तू न बोलता ही मला समजतं, तुला काय म्हणायचं. त्यासाठी, देहबोली, एखादा कटाक्ष, एखादा उसासा, एखादा हुंदकाच पुरेसा असतो. हे कळतात म्हणजे ती एक तपश्चर्याच आहे. चार चौघात, एकमेकांचे हसं हाऊ न देता व इतरा...

टांगेवाला

Image
DAY 22/30/22/JUNE/2020   टांगेवाला एक भला सायेब माह्या टांग्या मधी बसला काय सांगू गड्या त्याचा रुबाब कसला रेशमी रुमाल, उलनचा सूट आयना झक मारल, असा चकचकीत बूट सोनेरी चमचम, घड्याळाची साखळी वेळ बघून त्याने खिशामध्ये टाकली बोटांना सजवायला खड्याची अंगठी नशिबाची जणू फुल्ल गॅरंटी गोरपान रूप त्याचं, मिशीवर ताव मला म्हणाला "ए! जलदी लेके जाओ" हहरर..हाईक.. करत मी ओढला चाबूक टिक टॉक तालात पोटाची भूक एक एक मागे टाकीत मैलाचा दगड संग धावती चिंच, पिंपळ, अन वड सायबाचा टुमदार बंगला आला "ए! रुक जाओ इधर" साहेब म्हणाला "कितना हुआ" म्हणत खिशातून गुबगूबुत पाकीट काढले सवारीचे पैसे हातात वाढले "मेहरबानी" म्हणत मी पैसे कनवटीला बांधले मोडीचे नाणे सायबाला परतवले साहेबाच्या नोटेला अत्तराचा सुवास माझ्या नाण्याला फक्त घामाचा वास,  हहरर...हाईक...करत माझा पुढचा प्रवास,  हहरर...हाईक...करत माझा पुढचा प्रवास. © राहुल शिंदे © - Rahul Shinde 22/JUN/2020      

उनाड शब्द, लबाड अर्थ

Image
DAY 21/30/21/JUNE/2020  उनाड शब्द, लबाड अर्थ सुरेश भट साहेबांच्या ह्या ओळी बघा. खरं तर फक्त चार ओळी आहेत, पण त्याचा आशय किती खोल आहे.  पहिल्या ओळीतच 'उनाड' हा शब्द थोडासा आश्चर्यकारक वाटतो. सहसा आपण उनाड हा शब्द सवय किंवा स्वभाव ह्या संदर्भात वापरतो. उनाड पोरं, उनाड स्वभावाची पोरं अशी आपण अनेक वाक्य ऐकलेली आहेत. पण उनाड शब्दाचा असा वापर करताना, कवीला नक्की काय सुचवायचे असेल?  आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात. त्यातले काही आपण बोलबच्चम आहेत असे म्हणतो. ही लोकं फारच उथळ आणि हवेत बोलत असतात. पण त्यांची बोलायची तऱ्हा अशी असते की बरेचसे लोकं भारावून जातात, अगदी समर्पित होतात. कदाचित त्यांना ही जाणवत असेल पण त्यांची सद्सद विवेक बुद्धी काम करेंनाशीच होते आणि ते चक्क अश्या लोकांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवतात. आपण किती तरी वेळ बघतो रस्त्यावरचे विक्रेते, अनोळखी लोकं, भोंदू साधू आणि कसले कसले बाबा हे आपल्या साधेपणाचा, किंवा नावखेपणाचा सर्रास फायदा घेतात आणि आपण फसवले जातो. त्यामुळे इथे शब्द शाश्वत असले आणि त्यांचा अर्थ सरळ असला तरी शब्द वाहणाऱ्याच्या प्रवृ...

खंत

DAY 20/30/20/JUNE/2020 खंत वडीलधाऱ्या ह्या पायांना, शतादिकांचे हात स्पर्शती खंत एकच की उरला नाही एकही हात खांद्यावरती. - कुसुमाग्रज वरील कविता आपले लाडके कुसुमाग्रज ह्यांची आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली ती. चारच ओळी आहेत, तरी वर्धक्याचा आशय इतका नेमकेपणाने मांडला आहे. खरंच, म्हातारपणात आपण मांडायला सुरू केलेला संसार, अगदी बहरून, विस्तारून आपल्या डोळ्यासमोर खुललेला असतो. मुलं, मुली, सुना, जावाई, नातवंडं सगळे डोळ्यासमोर असतात. प्रेमाने आपली दखल घेत असतात, विचारपूस करत असतात. नातवंडं 'आजोबा आजोबा' म्हणून फेर धरत असतात. त्यांच्यामध्ये आपण मस्त रमलो असतो. आपला सगळा दिनक्रम त्यांच्या प्रमाणेच आपण आखलेला असतो. वर्तमानपत्र, टीव्ही, इतर बाहेरचे साहित्यिक कार्यक्रम, मित्रमंडळींशी गप्पाटप्पा सगळं अगदी दृष्ट लागावं असं चालू असतं. इतक्यात अचानक एके दिवशी सकाळी बातमी येते की आपला कॉलेज पासून चा जिवलग सवंगडी आपल्याला सोडून देवाघरी गेला. मनात चर्रर्र होतं. काळीज फाटते. असे एक एक सवंगडी सोडून गेले की धास्ती वाटू लागते. पुलंचा अंतू बरवा म्हणतो तसं, 'इजा झाला, बिजा झाला आता तिज्याच...

फिटे अंधाराचे जाळे

DAY 19/30/19/JUNE/2020  फिटे अंधाराचे जाळे बिग एफएम ९५.५ वर ४ ते ५ बंड्याचा 'चार चा चहा' कार्यक्रम मला भयंकर आवडतो. आज असाच वाफाळलेला चहाचा कप घेऊन बसलो आणि कार्यकम सुरू झाला. पहिलंच गाणं वाजलं, 'फिटे अंधाराचे जाळे' आणि एकदम तोंडातून दाद निघाली "अहाहा". 'लक्ष्मीची पाऊले' ह्या चित्रपटातील हे गाणं. शब्द अर्थात कविवर्य सुधीर मोघे आणि संगीत श्रीधर फडके. ह्या गण्याचे एक वैशिष्ठ म्हणजे, श्रीधर फडक्यांनी चाल दिलेलं गाणं, चक्क बाबूजी गायलेत. ह्या तिघांसाठी ती "अहाहा" ची दाद.  सुधीर मोघ्याच्या कविता आणि गाणी मला नेहमीच भावतात. ह्या गीताचे शब्दच इतके सकारात्मक आहेत की खरच मळभ सरून आकाश निरभ्र झाल्यासारखं वाटतं.   "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश" इथे फिटे आणि मोकळे हे शब्द असे भासतात की एखाद्या सावकाराकडून घेतलेले कर्ज फिटल्यामुळे शेतकऱ्याला जो मोकळेपणा वाटेल, तितका मोकळेपणा आकाशाला अंधार फिटल्यामुळे वाटतो. ते मोकळं होणं ऐकून, वाचून, आपल्याही मोकळं झाल्याची भावना येते. पुढच्या ओळी ही अतिशय सुंदर आहेत. ...

रंग

DAY 16/30/16/JUNE/2020   रंग मोरपंखी रंगाची मजाच काही और आहे निळाईतला हिरवा हिरवाईतला निळा जास्त वरचढ कोण आहे? संधीप्रकाशातला केशरी  खरच किती केशरी आहे? लाल आणि पिवळ्याचा तो एक संगमी मेळ आहे  हवेतला गुलाबी फारच रंगेल आहे  लाल मधून शोषलेला  पांढऱ्याचा तो प्रणय आहे  जांभळा म्हणजे लाल कमी निळा जास्त  असं तो रंग आहे  अनेक काल जिभेवरती  रेंगाळणारा संग आहे  असती रंग तीन मूळ तरी घडे किमया अदभूत त्या एकाच सफेद झोताचे  हे रंग वाहणारे पारदर्शी दूत     - राहुल शिंदे   © - Rahul Shinde 16/JUN/2020  https://tinyurl.com/yd8jq27l