गुड न्यूज
DAY 29/30/29/JUNE/2020 अरे एक ‘गुड न्यूज’ आहे बरका ओंकार, अभिजित म्हणाला. ‘गुड न्यूज' काय? आता अभिजित आणि मी इंजीनियरिंग च्या एकाच वर्षाला पण वेगवेगळ्या कॉल्लेगे मध्ये शिकत होतो. पण दोघंही मेकॅनिकल इंजीनियरिंग ला, दुसऱ्या वर्षाला. आता त्या काळात, त्या वयात आमच्या सारख्यांना गुड न्यूज म्हणजे काय तर सिनेमाला जाणे, किंवा बाहेर हादडायला जाणे, किंवा नात्यात ल्या कोणाची तरी मुंज, किंवा लग्न ठरणे. ह्या पलीकडे काय? अगदीच टोकाचे म्हणजे कॉलेज ला सुट्टी मिळणे, परीक्षा रद्द होणे किंवा सबमिशन ची तारिख पुढे ढकलणे. कसली गुड न्यूज असेल ह्याच्या विचारात मग्न असतानाच अभिजित म्हणला,”अरे,आत्याचं लग्न ठरलं!” ही आत्या म्हणजे, अभिजीत च्या वडिलांची कुठलीतरी लांबची बहीण. पण तिचं कोणीच नसल्यामुळे, ती अभिजीत च्याच घरी राहायची. तिचं नाव मीना. मीना आत्या तशी वयाने मोठी होती. जवळ जवळ ३२-३४वर्षांची असेल. त्याचे वडील मीना आत्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायचे. तिलाही ह्या मोठया भावा शिवाय कोण. "अरे सांगतोस काय? वा! मस्त! कधी आहे ?" " पुढच्या महिन्यात." अभिजित म्हणाला. मग बघता बघता लग्नाचा दिवस...