DAY 27/30/27/JUNE/2020 R.D. आज राहुल देव बर्मन, म्हणजेच आपले लाडके बर्मनदा, किंवा आर. डी. ,ह्यांचा वाढदिवस. आज जर ते हयात असते तर ८१ वर्षांचे असते. पण आर. डी. बद्दल भूतकाळात बोलणंच चुकीचे आहे. ते आजही त्यांच्या सागरासारख्या प्रचंड अश्या संगीतातील कार्यातून आपल्यातच आहेत. त्यांच्या संगीताचे गारुड आजच्या तरुण पिढीवरही तितकेच आहे जितके जुन्या पिढ्यांवर. आजची त्यांची गाणी सहज कुठेही गुणगुणली जातात, म्हंटली जातात. खरंतर आर. डी. अमर आहेत म्हंटलं तर चूक नाही ठरणार. आर. डी. ची range बघूनच वेड लागतं. नुसती चित्रपटाची नावं बघितली तरी ह्या माणसाचा आवाका कळतो पण तो आपल्या आवाक्यात कधीच येत नाही. १९६० मधले तिसरी मंझील, पडोसन, १९७० मधले कटी पतंग, द ट्रेन, मेला, कारवा, बुढा मिल गया, अमर प्रेम, सीता और गीता, जवानी दिवानी, बोंबे टू गोवा, रामपूरका लक्ष्मण, परिचय, यादो की बारात, अनामिका, जोशीला, आप की कसम, अजनबी, बेनाम, खेल खेल मे, दिवार, आंधी, वॉरंट, खिशबू, शोले, किताब, किनारा, धरम करम, घर, कसम वादे, नौकर, द ग्रेट गंबलेर, गोलमाल, आणि किती आणि किती. त्यांचा तो शोले मधला झोपळ्...